सर्वांसाठी शिक्षण . . . ?
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ‘शिक्षण’ ही समाजातल्या वरच्या वर्गाची आणि पुरुषांची मक्तेदारी होती. ते तसे नसावे आणि समाजातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत ते पोचावे, यासाठी गेल्या शतकात अनेक प्रयत्न झाले, चळवळी झाल्या. सर्वांनी शिकण्यामध्ये—-शहाणे होण्यामध्ये एकंदरीतच समाजाचीही उन्नती होणार आहे हा विचार हळूहळू पचनी पडला. त्याचे फलित म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने सर्वांपर्यंत शिक्षण पोचवणे ही आपली जबाबदारी मानली. …